अभंग

कुण्या विचारांचे गुंतले हे धागे
फिरतात मागे बहु प्रश्न...

उत्तरांची वीण उसवता मन
होई फार खिन्न नि विछिन्न...

तुझ्या चरणाशी उलगडे अर्थ
होई मग सार्थ माझी भक्ती...

तुझे पांडुरंगा लावताच ध्यान
झरे गात्रांतून दिव्य शांती...

-निलेश संगिता अनंत उजाळ.

Comments

Popular posts from this blog

मन ...

अभंग