Posts

अभंग

युगेयुगे द्यावे  जन्म एक पोटी  उजवावी ओटी  ममतेची !! हेचि मागणे बा  मागतोय खुळा  लागलाय लळा  या आईचा !! पुरवावी देवा  माझी आस वेडी  नाही व्यर्थ खोडी  निलेशाची !! ~निलेश संगिता अनंत उजाळ.

प्रेरणास्रोत...

तमोमय जीवन जगणाऱ्या समाजाला उजेडाचे डोळे देणारा समुह म्हणजे थंडरबोल्ट . या समुहाचा काल चौथा वर्धापनदिन दादर येथील मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या सुरेंद्र गावस्कर सभागृहात साजरा करण्यात आला . कवी म्हणून जगताना आजवर अनेक भव्य दिव्य कार्यक्रम पाहण्याचा योग आला होता . परंतु , एवढे कार्यक्रम करुन व अनेक पुरस्कार मिळवूनही आयुष्यात काही तरी बाकी राहील्यासारखे सतत वाटायचं . आपण समाजाचे देणे लागतो या विचाराने अस्वस्थ झालेले माझे मन कालच्या कार्यक्रमाने प्रसन्न होऊन गेले . जणू काय जीवनभराच्या साठवणीतला कालचा क्षण म्हणजे सर्वाधिक मौल्यवान आणि महत्वाचा असल्यासारखे वाटले . दैनंदिन जीवनात मेहनत आणि त्यासाठी करावा लागणार अत्यंत जोखमीचा प्रवास व त्यामुळे होणारी धडपड मनाला व मनातील सकारात्मक ऊर्जेला अचेतन करुन टाकते . अशावेळी माणूस हल्ली निरनिराळ्या प्रेक्षणीय स्थळी जाऊन मनाला प्रफुल्लीत करण्याची धडपड करतो . परंतु , माणसाचे हे सारे प्रयत्न निष्फळ ठरतात . कामाच्या व्यापातून थकलेल्या लो...

अभंग

कुण्या विचारांचे गुंतले हे धागे फिरतात मागे बहु प्रश्न... उत्तरांची वीण उसवता मन होई फार खिन्न नि विछिन्न... तुझ्या चरणाशी उलगडे अर्थ होई मग सार्थ माझी भक्ती... तुझे पांडुरंगा लावताच ध्यान झरे गात्रांतून दिव्य शांती... -निलेश संगिता अनंत उजाळ.

मन ...

मन तुझ्यात गुंतत जाते मन आतून बहरून येते हे स्वप्न असे की भास अशी जादू तुझी मज छळते                         -निलेश उजाळ.