प्रेरणास्रोत...
तमोमय जीवन जगणाऱ्या समाजाला उजेडाचे डोळे देणारा समुह म्हणजे थंडरबोल्ट . या समुहाचा काल चौथा वर्धापनदिन दादर येथील मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या सुरेंद्र गावस्कर सभागृहात साजरा करण्यात आला . कवी म्हणून जगताना आजवर अनेक भव्य दिव्य कार्यक्रम पाहण्याचा योग आला होता . परंतु , एवढे कार्यक्रम करुन व अनेक पुरस्कार मिळवूनही आयुष्यात काही तरी बाकी राहील्यासारखे सतत वाटायचं . आपण समाजाचे देणे लागतो या विचाराने अस्वस्थ झालेले माझे मन कालच्या कार्यक्रमाने प्रसन्न होऊन गेले . जणू काय जीवनभराच्या साठवणीतला कालचा क्षण म्हणजे सर्वाधिक मौल्यवान आणि महत्वाचा असल्यासारखे वाटले . दैनंदिन जीवनात मेहनत आणि त्यासाठी करावा लागणार अत्यंत जोखमीचा प्रवास व त्यामुळे होणारी धडपड मनाला व मनातील सकारात्मक ऊर्जेला अचेतन करुन टाकते . अशावेळी माणूस हल्ली निरनिराळ्या प्रेक्षणीय स्थळी जाऊन मनाला प्रफुल्लीत करण्याची धडपड करतो . परंतु , माणसाचे हे सारे प्रयत्न निष्फळ ठरतात . कामाच्या व्यापातून थकलेल्या लो...